Moth Week 17 July- 25 July 2021

फुलपाखरे सहसा दिवसा दिसतात आणि पतंग म्हणजेच Moths हे जास्ती रात्रीच्या वेळी दिसतात.
पतंग हे फुलपाखरांचे मोठे भावंड म्हणता येईल कारण ते फुलपाखरांच्या आधी उत्क्रांत झालेत.
संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळी फुलणाऱ्या फुलांमध्ये परागीकरण इतर कोणत्याही कीटकां पेक्षा जास्ती पतंग हे करतात.
रेशीम पतंगा पासून जगातले सर्वात किमती कापड बनवले जाते.
पतंग हे कित्येक पक्षी ,वटवाघळे, सरडे, पाली, बेडूक यांचे खाद्य आहे म्हणूनच जैव साखळीत यांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे.
काही पतंगां मधून निघणाऱ्या फेरोमेन चा उपयोग हृदयविकारात होऊ शकतो का यावर संशोधन चालू आहे .
पतंग हे फुलपाखरां इतकेच किंबहुना जास्त रंगीबिरंगी आहेत फुलपाखरांची संख्या ही पतंगांच्या फक्त दहा टक्के आहे.
भारतात फक्त चार हजार ते पाच हजार पतंगांच्या प्रजाती प्रजातींची नोंद झाली असावी उरलेले ५० ते ६० टक्के पतंग अजूनही नोंद झालेले नाहीत म्हणूनच National Moth Week सारख्या उपक्रमातून नवनवीन पतंगांच्या प्रजाती सामान्य माणसाच्या माध्यमातूनही शोध पावतील. त्याबरोबरच निसर्ग संवर्धनासाठी लोक स्वतःहून प्रयत्न करू लागतील हा या उपक्रमाचा हेतू आहे.

– मंगेश गोवेकर

 

Book

Bookings

Close
CAPTCHA image

This helps us prevent spam, thank you.